राष्ट्रीय सेवा योजना (NSS)
महाविद्यालयाच्या आरंभापासून राष्ट्रीय सेवा योजना हा विभाग कार्यरत आहे. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिस्त, स्वावलंबन, सामाजिक जाणिवा निर्माण करणे व त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणे या हेतूने राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना झाली. या योजनेअंतर्गत महाविद्यालयात दोन युनिट असून त्यात 75+75-150 विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी प्रवेश घेता येतो. नियमित कार्यक्रम आणि विशेष वार्षिक शिबीर असे या विभागाचे स्वरूप आहे. ‘NOT ME BUT YOU मी माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी’ हे या योजनेचे ब्रीदवाक्य आहे. प्रस्तुत विभागाकडून वर्षभरात विविध दिनविशेष साजरे केले जातात.
राष्ट्रीय छात्र सेना (NCC)
‘एकता आणि अनुशासन’ हे ब्रीदवाक्य घेऊन महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय छात्र सेना विभाग कार्यरत आहे. 53 महाराष्ट्र बटालियन, लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात एकूण 53 विद्यार्थ्यांना या विभागात प्रवेश दिला जातो. त्यामध्ये 67% मुले आणि 33% मुलींचा सहभाग असतो. विभागांतर्गत प्रत्येक आठवड्यात दोन (02) दिवस ड्रील आणि वर्षभरात दोन (02) ATC, TSC, NAC, COC, RDC, NIC, ALC इत्यादी शिबीरामध्ये विद्यार्थी सहभागी होतात. राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक कार्यात राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे योगदान मोलाचे आहे, तसेच या विभागाकडून वर्षभरात विविध दिनविशेष साजरे केले जातात.
क्रीडा विभाग (Sports Department)
बौद्धिक शिक्षणासोबतच मैदानी खेळ आणि शरीरसौष्ठव जतन व संवर्धनासाठी महाविद्यालयातील क्रीडा विभागाची देदीप्यमान कामगिरी आहे. दरवर्षी या विभागांतर्गत तालुका, जिल्हा, विद्यापीठ, आंतर विद्यापीठ, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धामध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून यश संपादन करतात. महाविद्यालय परिसरात भव्य क्रीडांगण, इनडोअर स्टेडिअम आणि आधुनिक क्रीडा साहित्यासह हा विभाग समृद्ध आहे.
सांस्कृतिक विभाग (सांस्कृतिक विभाग)
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून सांस्कृतिक विभाग कार्यरत आहे. या विभागांतर्गत वर्षभरात सातत्याने वक्तृत्व, काव्यवाचन, निबंधलेखन, गायन, वादन, नृत्य, नाट्य सादरीकरण इ. बौद्धिक, वाङ्मयीन स्पर्धेसोबतच विविध कलाप्रकाराचे आयोजन केले जाते. वार्षिक स्नेहसंमेलन आणि विद्यापीठ युक्क महोत्सवात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होतात व विविध पारितोषिके मिळवितात.
शैक्षणिक अभ्यास सहल विभाग
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपल्या दैनंदिन अभ्यासक्रमासोबतच ऐतिहासिक, धार्मिक, औद्योगिक व निसर्गरम्य ठिकाणांना भेट देऊन माहिती घ्यावी व अभ्यास करावा, पर्यावरण व निसर्गाची ओळख व्हावी या उद्देशाने दरवर्षी महाविद्यालयाकडून आणि महाविद्यालयातील विविध विभागांकडून शैक्षणिक अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात येते. याकरिता महाविद्यालयात शैक्षणिक अभ्यास सहल विभाग कार्यरत आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये कनिष्ठ विभागाच्या वतीने बिदर, वाणिज्य विभागाच्या वतीने किल्ले नळदुर्ग, अर्थशास्त्र विभागाच्या वतीने रांजणी व अंबाजोगाई, हिंदी विभागाच्या वतीने हुमनाबाद व कलबुर्गी आणि राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने अटारी-वाघा सीमा, अमृतसर, नवी दिल्ली व हैद्राबाद येथे शैक्षणिक अभ्यास सहलींचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
करिअर कट्टा
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या महाविद्यालयामध्ये ‘करिअर कट्टा’ उपक्रम कार्यरत आहे. सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची माहिती व मार्गदर्शनासाठी ‘आय.ए.एस. आपल्या भेटीला आणि उद्योजक व उद्योजकता निर्माण व्हावी यासाठी ‘उद्योजक आपल्या भेटीला’ हे उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा या उद्देशाने कौशल्य विकासाची माहिती व प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करिअर कट्टा या माध्यमातून केला जातो. करिअर कट्टा या उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी समन्वयक डॉ. सत्यशीला जोंधळे (मो.क.9595959792) यांच्याशी संपर्क साधावा.